महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), एस.के.ऑरगॅनिक फार्म व प्रबोध उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू लागवड तंत्रज्ञान व बांबू पॉलिहाऊस निर्मिती याविषयीचे एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), एस.के.ऑरगॅनिक फार्म व प्रबोध उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि२४) आयोजित करण्यात आले होते. यावेळी आत्माचे पुणे संचालक संजय काचोळे व तालुका कृषी अधिकारी भोर रोहित क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू लागवड व तंत्रज्ञान यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ हेमंत बेडेकर , श्रीधर काळे , हिरामण शेवाळे , संगीता कुलकर्णी, प्रशांत सरडे , शिवराज पाटील , किरण यादव , शिल्पा चव्हाण , लक्ष्मीकांत कणसे , सागर तुपे , सौरभ खुटवड व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी डॉ.हेमंत बेडेकर यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवडिबाबत सखोल मार्गदर्शन केले. श्रीधर काळे यांनी बांबू हे या भागातील हिरवे सोने आहे , त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी यासाठी कृषि विभाग व आत्मा यांच्या कडून सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. निवृत्त तालुका कृषि अधिकारी हिरामण शेवाळे यांनी भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड असलेल्या मेस बांबूची माहिती दिली व त्याला बाजापेठेत असलेल्या मागणीबाबत मार्गदर्शन केले. बांबू लागवड तसेच बांबू लागवडीसाठी कृषी विभाग व पंचायत समिती भोर यांच्याकडून सुरू असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेविषयी सखोल मार्गदर्शन शिवराज पाटील भोर पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी केले. संगीता कुलकर्णी ज्ञानप्रबोधिनी निगडी यांनी बांबूची जैवतंत्रज्ञान पद्धतीने तयार होणाऱ्या रोपांची माहिती दिली व बांबू वर प्रक्रिया करून शोभिवंत वस्तू तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठेत असलेली मागणी याबाबत माहिती दिली. युवा शेतकरी किरण यादव यांनी समूह शेतीबाबत मार्गदर्शन केले व शेतकरी उत्पादक कंपनी च्या कार्याची माहिती दिली. सौरभ खुटवड यांनी सेंद्रिय शेती व सेंद्रिय निविष्ठा निर्मितीबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांनी तयार केलेल्या बांबू पॉलीहाऊसची माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी बांबू लागवड क्षेत्राची तसेच बांबूपासून तयार केलेल्या पॉलिहाऊसची पाहणी केली. सदर प्रशिक्षणासाठी भोर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.