अभिनेता सुबोध भावे यांचे दिग्दर्शन असलेला कट्यार काळजात घुसली या सिनमाने त्यावेळी अनेक रिकार्ड मोडीत काढत अनोखा इतिहास रचला होता. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन सोडले होते. याच धर्तीवर सुबोध भावे यांचा आणखी संगीतमय जादू अनुभवणारा सिनेमा येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे नाव ‘संगीत मानापमान’ असून, सिनेमाचा पहिला टीझर सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
स्वर, सौंदर्य आणि शौर्याचा अद्भुत मिलाफ! सादर आहे कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवरून प्रेरीत ‘संगीत मानापमान’ ह्या संगीतमय चित्रपटाची झलक. येत्या दिवाळीत रुपेरी पडद्यावर अनुभवूया मराठी परंपरेचा साज आणि सुरेल गीतांचा आवाज, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. सिनेमा १ नोव्हेंबर या दिवशी रुपेरी पडद्यावर म्हणजेच थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. सिनेमात धैर्यधरची भूमिका अभिनेता सुबोध भावे यांनी साकारली असून, धैर्यधरला सैन्यात भरती होण्याची इच्छा आहे. पण त्याची आई मात्र त्याच्या इच्छेच्या विरोधात असून, त्याला लग्नबंधनाच्या बेडीत अडकविण्याच्या घाईत आहे. तरी देखील धैर्यधर नक्की कोण आहे? याचे कारण म्हणजे राजा हा तर धैर्यधीर नाही ना किंवा त्याचा पूर्नजन्म झाला आहे का? असे अनेक प्रश्न सिनेमाच्या टीझरमध्ये गुपित ठेवण्यात आलेले आहेत.
सिनेमाला शंकर एहसान लॅाय यांचे संगीत लाभले असून, येत्या १ नोव्हेंबरला संगीत मानापमान रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात संगीतासोबत अनोखी शौर्यगाथा पाहिला मिळणार यात काही शंका नाही. भामिनीचा उल्लेख आपल्याला या टीझरमधून सातत्याने दाखविण्यात आलेला आहे. मात्र या पात्राचा चेहरा आपल्याला कोठेही दिसत नाही. यामुळे या प्रश्नाची उकल पुढच्या टीझर किंवा ट्रेलरमधून मिळेल, असे वाटते. धैर्यधर टीझरमध्ये म्हणतो ….आता शिभोतेस ना, माझी वरमाला! आणि येथेच टीझर संपतो. त्यामुळे आता या सिनेमाबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.