जखमींवर दवाखान्यात उपचार
भोर – तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील बारे बुद्रुक मधील एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्तींना म्हाळवडी गावातील दोन युवकांनी दगडफेक करीत मारहाण केल्याची घटना ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शनिवार (दि.०१) सायंकाळच्या सुमारास घडली.
प्रथमदर्शनी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारे बुद्रुक मधील ओम दानवले, पांडुरंग दानवले, अर्चना दानवले, नारायण शंकर दानवले ,व कुंडलिक साळेकर या नागरिकांना त्यांच्या घरी राईस मिलवर जाऊन म्हाळवडी येथील दोन युवकांनी जुन्या भांडणाच्या वादातून मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले.त् यामधील जखमींना सरकारी व खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे अशी माहिती मिळाली आहे संबंधित वादाबाबत भोर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होत आहे.