Sunday, June 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

A to Z Story | इरशाद शेख आत्महत्ये प्रकरणी तीस ते चाळीस जणांवर गुन्हा दाखल; मृत्यूपूर्वीच्या पत्नीला पाठविलेल्या व्हॉट्सअॅप संदेशात उघड झाले धक्कादायक तपशील

by Team Rajgad Publication
October 9, 2025
A to Z Story | इरशाद शेख आत्महत्ये प्रकरणी तीस ते चाळीस जणांवर गुन्हा दाखल; मृत्यूपूर्वीच्या पत्नीला पाठविलेल्या व्हॉट्सअॅप संदेशात उघड झाले धक्कादायक तपशील

भोर : भोर तालुक्यातील सारोळा गावातील जामा मस्जिदमध्ये इरशाद इमाम शेख (वय ४०, रा. पांडे, ता. भोर) या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत इरशादचा भाऊ असिब इमाम शेख (वय ३८, रा. केशवनगर, वडगाव मावळ) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, 1) पुजा माने पुर्ण नाव पत्ता माहीत नाही. 2) पुजा माने हीचा भाउ नाव पत्ता माहीत नाही 3) पुजा माने हीचा मामा सुशांत विजय करंजकर पत्ता माहीत नाही 4) ओंकार भोसले पुर्ण नाव माहीत नाही व इतर अनोळखी 30 ते 40 यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना ? 

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

फिर्यादी असिब शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ इरशाद शेख हा गेल्या वर्षभरापासून भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथील “इन यंत्रा कंपनी”मध्ये एस.एम.टी. लाईन इंचार्ज म्हणून काम करत होता. त्याच कंपनीत पूजा माने ही महिला ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. कामाच्या ठिकाणी दोघांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. दोघे एकमेकांच्या अडचणींबाबत बोलत असत, परंतु या नात्याचा गैरसमज पूजाच्या कुटुंबीयांना झाला.

मारहाणीची धक्कादायक घटना

फिर्यादीनुसार, ४ ऑक्टोबरच्या रात्री पूजा मानेचा भाऊ, तिचा मामा आणि सुमारे ३० ते ४० अनोळखी इसमांनी इरशादच्या राहत्या घरी जाऊन लाठी-काठ्यांनी मारहाण केली, शिवीगाळ व धमक्या दिल्या. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ५ ऑक्टोबरला दुपारी पुन्हा पूजा मानेचा भाऊ प्रशांत माने, मामा सुशांत विजय करंजकर व इतर १० ते १२ जणांनी इरशादवर हल्ला केला. सलग दोन दिवस झालेल्या या हल्ल्यांमुळे इरशाद प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता.

याच तणावामुळे त्याने “इन यंत्रा कंपनी”तील नोकरीचा राजीनामा दिला. ८ ऑक्टोबर रोजी तो आपल्या भावाकडे चाकण येथे गेला असता, त्याने संपूर्ण घटना सांगितली आणि तो अत्यंत घाबरलेला दिसत होता. त्याच दिवशी सायंकाळी तो पुन्हा पांडे गावाकडे परतला.

मस्जिदमध्ये गळफास घेतला

९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता रफीक सय्यद या परिचित व्यक्तीचा फोन असिब शेख यांना आला आणि त्यांनी कळवले की, “इरशादने सारोळा येथील जामा मस्जिदमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.” असिब घटनास्थळी पोहोचले असता, इरशादचा मृतदेह मस्जिदमधील पंख्याला दोरीने लटकलेला आढळला.

या सर्व घटनांवरून इरशाद शेखला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजगड पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करत आहेत.

मृत्यूपूर्वीच्या पत्नीला पाठविलेल्या व्हॉट्सअॅप संदेशात उघड झाली धक्कादायक माहिती..

घटनास्थळावर इरशादच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप मेसेज वाचण्यात आला. त्या मेसेजमध्ये त्याने आपल्या आत्महत्येसाठी पूजा माने, तिचा भाऊ प्रशांत माने, मामा सुशांत करंजकर, ओंकार भोसले व इतर काही व्यक्तींना जबाबदार धरले होते. मेसेजमध्ये त्याने लिहिले होते की –

Pooja Mane, the ladies operator working under me, told me everything about her personal life that she has a problem with her monthly period and is undergoing treatment from her family doctor. She also does not have a boyfriend, she needs a boyfriend. And she suffers a lot on the second day of her period, which would reduce after she had a physical relationship with him. Therfore, since she was frank with me, i was cheated on and because of that, I was fired from my inyantra company, I had to lose my job for that. However, she should be held fully responsible for this act. Also for that reason, on 4th October 2025 between 08.30 and 09.00 pm, a group of 30 to 40 boys who came from Shirwal, kicked me with sticks and beat me with sticks, hitting me on the head with the branches of trees near my house. Among them was Omkar Bhosale, who had demanded Rs. 5,000 from me on 6th October 2025 Then the next day, i.e. 5th October, a group of 10 to 15 boys who came from Wai, including the girls brother Prashant Mane and his maternal uncle, beat me with sticks and kicks.

Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच
दौंड

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?
क्राईम

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
भोर

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित
वेल्हे

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा
भोर

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Next Post

भोर तालुक्यातील पंचायत समिती ८ गणांचे तर जिल्हा परिषद ४ गटांचे आरक्षण जाहीर

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group