तुम्हालाही घोरण्याची समस्या सतावतीये? तर ‘हे’ घरगुती उपाय केल्यास होईल मोठा फायदा…प्रत्येकाला वाटतं की आपल्याला चांगली, शांत झोप लागावी. पण बहुतांश जणांना झोपताना काहीना काहीतरी समस्या जाणवते. त्यामध्ये घोरण्याची समस्या ही अनेकांना सतावत असते. ही समस्या जरी सामान्य वाटत असली तरी त्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. यावर काही घरगुती उपायही आहेत, ज्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
घोरण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. घोरणे हे काही अनुवंशिक असू शकते. मात्र, मान जाड असणे, गरोदरपणा, लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा यांसारखी कारणे यामागे असण्याची शक्यताही असते.
हळद आणि मध यावर फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध याचं सेवन करावे. रोज काही दिवस हे केल्याने तुमची घोरण्याची समस्या कमी होईल. याशिवाय, ऑलिव्ह ऑईल हे देखील गुणकारी आहे. ऑलिव्ह ऑईलने तुम्ही नाक साफ केल्यास श्वास घेण्यास सोपं होतं.