भोरः भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या प्रचाराला तालुक्यातील नागरिकांचा उस्फुर्त प्रदिसाद मिळत आहे. शिवसेना (शिंदे) तिकीट कापल्याने नाराज झालेल्या कोंडे यांनी बंडखोरीचे निशाण फडकवित अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला. प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी त्यांनी एक सभा घेतली. या सभेच्या माध्यमातून तिकीटबाबातीचा खुलासा केला. त्यांनी घेतलेल्या सभेला भोरवासियांचा उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला आहे. निवडणूक आयोगाने कोंडे यांना अॅटो रिक्षा हे चिन्ह बहाल केले आहे. प्रचाराच्या पहिल्याच सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या सभेच्या माध्यमातून कुलदीप कोंडे यांनी संधी दिल्यास भोरचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन दिली आहे. गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणाऱ्या भोर एमआडीसीचा प्रश्न विधानसभेला संधी दिल्यास १ वर्षातच निकाली काढणार असल्याचे वचन त्यांनी भोरवासियांना दिले आहे. तसेच तालुक्यात विविध विकास कामे राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे कोंडे हे जर अपक्ष निवडणुकीला समाोरे जाणार असल्याने त्यांना नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे. भोर विधानसभेत त्यांच्या वतीने प्रचार यंत्रणेने वेग घेतला असून, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक कामाला लागले आहे.