राजगडः राजगड किल्ल्यावर रविवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पद्मावती माचच्या परिसरात चुलीवर स्वयंपाक करण्यात आल्याने तयार झालेल्या धुरामुळे आग्या मोहळाच्या माश्यांनी तेथे असलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात ४५ पर्यटक जखमी तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सुट्टीने असल्याने तब्बल तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी येथे गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले होते. मधमाशांनी हल्ला करताच पर्यटकांची मोठी धांदल उडाली होती. पर्यटक सैरावैरा होऊन पळत सुटले होते. यातील काही पर्यटकांनी पद्मावती तलावात उड्या मारल्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. चिवताळलेल्या आग्या मोहाळाच्या माश्यांनी पर्यटकांवर हल्ला चढविल्याने ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत.