Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कौल पुरंदरच्या मतदारराजाचाः पुरंदरकरांच्या ‘संमिश्र’ प्रतिक्रिया; कोणा एकालाही ‘स्पष्टपणे’ पसंती नाही 

by SBPRNL
November 1, 2024
कौल पुरंदरच्या मतदारराजाचाः पुरंदरकरांच्या ‘संमिश्र’ प्रतिक्रिया; कोणा एकालाही ‘स्पष्टपणे’ पसंती नाही 

जेजुरीः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुरंदरमध्ये खूप मोठे राजकीय घमासान पाहिला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे दिसत असले तरी ४ नोव्हेंबरला यावर स्पष्टता मिळेल. पुरंदरकरांच्या मनात काहीशी संभ्रवस्था निर्माण झाली आहे. मतदारांच्या मनातील प्रतिक्रिया संमिश्र येत असल्याने उमदेवारांनी निवडून येणार अशी दावेदारी केली असली तरी मतदारराजा कोणाच्या पारड्यात मतदानरूपी मतांचे दान टाकतो, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. अनेक नेत्यांनी पुरंदरकरांना अनेक आश्वासने दिलेली आहे. त्यापैकी किती पूर्वत्वास गेली हा खरा प्रश्न आहे. पुरंदर उपसा सिंचन योजना ही ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पुरंदरकरांच्या माथी मारली. त्याची अवस्था दयनीय आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार हे एकच वाक्य नेते मंडळी गिरवताना दिसत आहेत. यामुळे इथल्या जनतेच्या मनात नाराजीचा सूर आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

तालुक्यात कोणतेही मोठे कॅालेज नाही 

तालुक्यात सासवडमध्ये वाघीरे विद्यालय वगळता कोणतेही भव्य दिव्य पद्धतीचे महाविद्यालय येथे नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास बारामती येथे टीसी कॅालेज आणि व्हिपी कॅालेज आहेत. तशा प्रकारचे कॅालेज या ठिकाणी नाही. आजवर अनेकांनी आश्वसने दिली, ती निवडणुकीपुरतीच. यामुळे इथल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्याची कास धरावी लागत आहे. इथले बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात वा इतरत्र जात आहेत. त्या ठिकाणचा खर्च आवाच्या सव्वा असल्याने शिक्षणासाठी मोठा भुर्देंड विद्यार्थ्यांच्या पालकांना सोसावा लागत आहे.  सध्याच्या घडीला केवळ इंजिनिअरिंग, आर्टस, कार्मस वा सायन्स याहीपेक्षा अनेक प्रकारचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. तशा प्रकारचे व्होकेश्मल कोर्सस येथे नाहीत.

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न 

पुरंदर तालुक्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळांची शेती केली जाते. या शेतीसाठी वा इतर प्रकारच्या शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये पुरंदर तालुक्याचा देखील समावेश करण्यात आला होता. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पैसे देऊन पिण्यासाठी पाणी घ्यायची वेळ आली होती. तर शेतकऱ्यांना शेतीसाठी देखील टँकरने पाणी देण्याची वेळ आली होती. वीज पुरवठा सातत्याने खंडीत होणे ही एक मोठी समस्या या भागातील नागरिकांना भेडसावत आहे.

संमिश्र प्रतिक्रिया 

यामुळे तुमच्या मनातला आमदार कोण? असे विचारल्यावर अनेकजण आमच्या मनातला आमदार तुम्हाला का सांगायचा असा प्रतिप्रश्न करीत आहेत. राजकारणाबद्दल अनेकांची मते फारशी समाधानकारक नाही. यामुळे रिंगणात असलेल्या कोण्या एकाला सर्वाधिक पसंती मिळत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. मतदारांची मते ही संमिश्र स्वरुपात येत आहेत. जनता सध्या विचार करीत आहे, ते आपले मतदान करून मतदानाचा हक्क जरूर बजावतील पण ते मतदान कोणाच्या पारड्यात अधिक पडेल, यासाठी २३ नोव्हेंबरजी सकाळ उजडावी लागेल.

Tags: maharashtravidhansabhaelection2024purandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
शिरवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा: ४५ जणांवर गुन्हे दाखल, १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

शिरवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा: ४५ जणांवर गुन्हे दाखल, १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group