खंडाळाः वाई विधानसभा मतदार संघात युतीचे उमेदवार मकरंद पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने येथे घेतलेल्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे पाटील यांच्यावर अत्यंत खालाच्या शब्दांत टीका केली होती. या टीकेचा समाचार पुरुषोत्तम जाधव यांनी घेतला असून, त्यांनी कलेल्या वक्तव्याचा निषेध जाधव यांनी कार्यकर्ता बैठकीमध्ये व्यक्त केला. तसेच ज्या खंडाळा तालुक्याच्या जीवावर आपल्या तीन पिढ्या राजकारण व समाजकारणात करीत आल्या, अशा खंडाळा तालुक्यातील नेतृत्व करत असलेल्या व आपल्याच ज्येष्ठ सच्चा कार्यकर्त्याला मकरंद पाटील यांच्या जाहीर सभेत अत्यंत खालच्या शब्दांत टीका करण्यात आली. हे खंडाळा तालुक्यातील तमाम जनतेसाठी घृणास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मकरंद पाटील यांच्या पायखालची वाळू सरकलीः जाधव
ज्या खंडाळा तालुक्यातील जनतेने आपणास आतापर्यंत डोक्यावर घेऊन नाचवले आता हीच जनता आपल्याला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नसल्याचा थेट इशारा पुरुषोत्तम जाधव यांनी मकरंद पाटील यांना दिला आहे. यामुळे इथले राजकीय वातावरण हाय व्होल्टेजवर असल्याचे पाहिला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीचे उमेदवार मकरंद पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून आता खंडाळा तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यावर तोंडसुख घेण्याचे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत.
….आता वेळ आली घराणेशाहीला घरी बसविण्याचीः जाधव
ज्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी आयुष्यभर पाटील घराण्यासाठी निष्ठा वाहिली. अशा एकनिष्ठ नेत्यांनाच त्यांची लायकी काढण्याचे उपरती सुचत आहे. संविधान आणि लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मात्र, या सभेमध्ये मकरंद पाटलांच्या विरुद्ध लढल्यास लोक वेडी होतात, असे वक्तव्य करून जे कोणी लढणारे उमेदवारच्या विरुद्ध टीका करण्यात आली आहे. यामुळे वाई विधानसभेतील जनतेने आता तरी या घराणेशाहीला कायमचे घरी बसवण्यासाठी एक व्हावे. मी नेतृत्व करण्यास तयार असल्याचे जाधव यांनी सांगितले. आपण फक्त पाठीशी राहा, एका एकाची पळताभुई केल्याशिवाय हा पुरुषोत्तम स्वस्थ बसणार नाही. असे ते म्हणाले.