इंदापूरः काल इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या अगोदर झालेल्या सभेमध्ये हर्षवर्धन बोलत असताना व्यासपीठावर एक व्यक्ती आली. तिने गाडीचा हप्ता भरला नाही म्हणून काही फायनान्सच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच त्या व्यक्ती मामा असे नाव घेत होत्या. असे सांगण्यात आले. यावेळी हर्षवर्धन यांच्या समर्थकांनी गुंडगिरी हटावच्या घोषणा यावेळी दिल्या. या सगळ्या प्रकरणावर दत्तात्रय भरणे यांनी माझा आणि फायनान्सचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित करीत लबाड लांगडं ढाँँग करतय अशी उपरोधिक टीका केली.
राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या वतीने दत्तात्रय भरणे हे दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. त्या अगोदर त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भव्य सभा घेतली. या सभेला युतीमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नाव न घेता त्यांच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. रस्ता केला म्हणून तर खड्डा पडला. ज्यांनी रस्ता केलाच नाही तर खड्डा पडणार असा असा देखील सवाल भरणे यांनी उपस्थित केला आहे. विविध विकास कामे तालुक्यात झाली असून, ज्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, त्यांना काय बोलणार असे ते यावेळी म्हणाले.
पुढे ते असे म्हणाले, लबाड लांगड ढाँग करतयं असे म्हणत इंदापूरची लोकं हुशार आहेत. काही झालं की माझं नाव घ्यायचं. यामुळे मला आता त्यांनीच माझं नाव घेतल्यामुळे प्रचार करण्याची मला गरज नाही. बारामतीनंतर जंक्शनमध्ये मोठी एमआयडीसी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ५ टीएमसीची योजना गैरसमज करून नामंजूर केली असल्याचा आरोप देखील भरणे यांनी यावेळी बोलताना केली आहे. ही शेवटची सभा असून, २० तारखेचा निरोप मी आता देत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणाच निरोप येऊ अगर न येवू याचा वाट न बघता मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या मतदार संघात राष्ट्रवादी( शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) असा सामना पाहिला मिळणार आहे.