पुणेः महायुतीमधील भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यापाठोपाठ काल रात्री उशिरा शिवसेना (शिंदे) यांच्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वतीने ३८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही महायुतीमध्ये काही जागांवर मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्या संबंधित जागांवर एकमत झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ३८ उमेदवारांंची नावे जाहीर करण्यात आली आहे. ही पहिली यादी असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अजित पवार स्वत: बारामतीतून लढणार आहेत. हडपसरमधून चेतन तुपे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच पिंपरीमधून अण्णा बनसोडे, तर इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.