वाईः कोणतेही कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली असल्याचे विधान पुरुषात्तम जाधव यांनी केले. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व.आबासाहेब वीर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांचेच सत्तेचे विकेंद्री करून विचार मोडीत काढायचे अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. एकाच घरात सत्ता घेऊन जनतेला झुलवत ठेवून झुंडशाही निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आता जनताच पेटून उठली असल्याचे देखील जाधन यावेळी म्हणाले. वाईमधील खानापूर येथील संवाद परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते.
आता सर्व पक्षातील विरोधकांनी एकीची मोट बांधली असून वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी वाई विधानसभा युवा सेना योगेश फाळके, वाई तालुका उप तालुका प्रमुख गणेश सावंत, युवासेना वाई तालुकाप्रमुख गणेश पवार, वाई शहर युवा सेना किशोर भगत, विभाग प्रमुख प्रताप भिलारे, खंडाळा संदीप जाधव, गणेश महांगडे, तालुका उप तालुका प्रमुख सचिन धायगुडे, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक भानुदास जाधव, अॅड उमेश पवार वाई शहर व सर्व भागांतील शिवसैनिक व प्रमुख मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुरुषोत्तम जाधव यांनी वाई तालुक्यातील खानापूर, पांडे गावातील नागरिक, महिला आणि युवकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अभी नही तो कभी नही….!
या विधानसभा क्षेत्रात कोणत्याही शाश्वत विकास झाला नसल्याने बेरोजगारी वाढलेली आहे. आमदार मात्र जननायक म्हणून समाजात वावरत आहेत. या जननायकाचे पितळ तरुणांनीच उघडे पाडले आहे. तरुण पिढी विद्यमान आमदारांना जाब विचारू लागली असल्याचे जाधन म्हणाले. यामुळे गावोगावी अभी नही.. तो कभी नही…! असा नारा तरुणांच्यातून सुरू असल्याचे देखील जाधव यांनी सांगितले.