इंदापूरः गेल्या बऱ्याच काळापासून मा. मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यातच पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे पाटील आपल्या हाती तुतारी घेणार असल्याचे निश्चित झाले होते. तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत हर्षवर्धन पाटील यांनी बैठक घेतली. यानंतर त्यांनी अधिकृत आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करीत असल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केले आहे. तसेच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच पक्ष प्रवेशाबाबत पक्षातील जयंत पाटील, सुप्रिया सुळे अधिक माहिती देतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पवार कुटुंबाचे आणि आमचे राजकाणाशिवाय व्यक्तीगत संबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर उतर देणे टाळले आहे. इंदापूर तालुक्यातील १० वर्षांची दुरुस्ती करण्यासाठी परिवर्तन महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. कधीही आपण टोकाचे भूमिका घेतलेली नाही. पक्ष सोडत असल्याची माहिती देखील फडणवीस यांना कळवली आहे. पुढच्या काळामध्ये इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपवून भविष्यात अनेक गोष्टी केल्या जाणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षापेक्षा निष्ठा महत्वाची असते. त्यांच्या पक्षात मी प्रवेश करीत आहे, आता पुढचा रोल त्यांचा असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला
कधीही आपण टोकाची भूमिका घेतलेली नाही. टीका करण्यापेक्षा भविष्यातील परिवर्तनासाठी आपण सर्वांनी तयार असायला हवे. त्यादृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, पुढील काळात जे व्हायचं आहे ते होणारच आहे. त्यामुळे सर्वांनी सबुरी घ्यावी, असे पाटील यांनी सांगितले.