वेल्हा(राजगड): येथील वडघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची नुकतीच निवडणूक सरपंच सुवर्णा नथूराम डोईफोडे यांच्या अध्यक्षातेखाली पार पडली. बेबी भरेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. संदीप डोईफोडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गजानन पवार यांनी कामकाज पाहिले.
यावेळी सरपंच सुवर्णा डोईफोडे, मा. उपसरपंच बेबी भरेकर, सामाजिक कार्यकर्ते नथुराम डोईफोडे, सदस्य कुणाल तांबे, सदस्य संगीता डोईफोडे, सदस्य कोंडाबाई डोईफोडे, सदस्य, सुरेश मरगळे आंबेगाव, मा. सरपंच सुदाम तांबे, महादू भरेकर, अरुण भरेकर, मा. उपसरपंच विकास पिलाने, राहुल शेंडकर, रमाकांत भरेकर, देविदास भरेकर, स्वप्निल भरेकर, तुकाराम डोईफोडे, मारुती सेंडकर, अशोक डोईफोडे, शिवाजी डोईफोडे, पोलीस पाटील संतोष डोईफोडे, अंजना भरेकर उपस्थित होते.