लोकअदालतीमुळे होतोय न्यायव्यवस्थेवरील भार कमी
न्यायालयात प्रलंबित असलेले खटले,वाद विवाद, सामंजस्याने तडजोड करून प्रभावीपणे निकाली काढले जातात.अशाच झालेल्या लोकअदालतीत म्हणजेच लोक न्यायालयात भोरला ८० प्रकरणे निकाली काढत ,४ लाख ६२ हजारांची वसुली करण्यात आली. शनिवार (दि.२८) झालेल्या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक आदलतीमध्ये एकूण ३५४ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ६६ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ०३ लाख १८ हजार ९७५ रुपयांची वसुली झाली तसेच या लोक अदालती मध्ये १४३० दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १ लाख ४३ हजार ७०१ इतक्या रकमेची वसुली झाली अशी सर्व एकूण १७८४ प्रकरणांपैकी ८० प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण ०४ लाख ६२ हजार ६७६ रुपयांची वसुली झाली.
या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये पॅनल क्रमांक-१ चे पॅनल प्रमुख न्यायाधीश नेहा नागरगोजे, दिवाणी न्यायाधीश व पॅनल सदस्य, नेहा वनशिव व पॅनल क्रमांक-२ चे पॅनल प्रमुख मीना जाधव, पॅनल सदस्य सचिन इंगुळकर यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले.
सदर लोकअदालतीसाठी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष मयुर धुमाळ, उपाध्यक्ष बाळासाहेब गोगावले, विश्वनाथ रोमण, विठ्ठल दुधाणे, सुनिल बांदल, विजय दामगुडे, राजेशकुमार बारटक्के, विक्रम घाेणे, अजिंक्य लाड, धीरज चव्हाण, साहिल मुकादम, अश्वीनी टोले-कुलकर्णी, जयश्री शिंदे, मनिषा तारु, हर्षदा खंडाळे, माधुरी रांजणे व इतर सर्व वकील सदस्य उपस्थित होते. तसेच दिवाणी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सुमेध गुजर व न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पोलिस कर्मचारी, बॅंक, पतसंस्था यांचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.