इंदापूरः राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत असतानाच इंदापूर तालुक्यातील एका गावात ८० वर्षांच्या वृद्धाने २६ वर्षीय मतीमंद मुलीवर बलजबरीने बलात्कार केल्याची निंदनीय घटना उघडकीस आली आहे. २२ सप्टेंबर रोजी तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला.
या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी ८० वर्षीय आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद मिठ्ठापल्ली हे करीत आहेत.
या घटनेमुळे येथील धार्मिक संघटना आक्रमक झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. घटनेमुळे सगळ्या स्तरामधून या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवून रोष व्यक्त करण्यात येत आहे. घडलेली घटना अतिशय निंदनीय असल्याचे बोलले जात आहे.