बॅालीवूड इंडस्ट्रीमधील क्यूट क्वीन सध्याच्या घडीला आपल्या अभिनयाची जादूची माया प्रेक्षकांवर करणारी अभिनेत्री आलिया भट(aaliya bhatt) हिच्या जिगरा (jigara) सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाच्या रिलीजसाठी अवघे १० दिवस शिल्लक असताना जिगराचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याअगोदर जिगराची गाणी कम टीझर रिलीज झालेले आहेत. सिनेमात बहिण-भावाची निखळ गोष्ट प्रेक्षकांना पाहिला मिळणार आहे. आलिया तिच्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आलेली आहे. जिगरामध्ये देखील तिची एक वेगळी धाटणी असलेली भूमिका तिने साकालेली आहे. येत्या ११ अॅाक्टोंबरला जिगरा थेएटरमध्ये रिलीज होणार आहे.
सिनेमात सत्या आणि अंकुर या बहिण भावाची गोष्ट असणार आहे. सिनेमाची कथा परदेशात घडताना ट्रेलरमधून दिसत आहे. आजवर आलियाला आपण वेगवेगळ्या सिनेमांमध्ये अनेक व्यक्तीरेखा साकारताना पाहिलेलं आहे. परंतु जिगरामधली आलिया काहीशी वेगळी दिसत आहे. जिगरा सिनेमा पूर्णपणाने तिचाच आहे. तिच सिनेमाची हिरो आहे. भावाला वाचण्यासाठीची तिचे धडपड आपल्याला दिसते. भावासाठी काहीही असे म्हणत ती दुनियेशी लढताना पाहिला मिळते. ती अॅक्शन देखील करताना दिसते. जिगराचे दिग्दर्शन वसन बाला यांनी केलं आहे. सिनेमात अजून अनेक कलाकार आहेत. पण जिगरा हा पूर्णपणाने आलियाचाच आहे हे मात्र नक्की.