एक डाव भुताचा सिनेमाचा ट्रेलर प्रर्दशित झाला असून, ट्रेलरमधून सिनमाचा प्रभाव तितकासा जाणून येत नाही. या सिनेमात सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे हे बडे अभिनेते आहेत. तर टीव्ही सिरिएलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी देशमुख आहे. तसेच इतरही अनेक कलाकार या सिनेमात पाहिला मिळणार आहेत. खरं तर कोणत्याही सिनेमाचा ट्रेलर हा त्या सिनेमात काय असणार थोडक्यात सांगतो. मात्र, या सिनेमाचा ट्रेलरमध्ये तसे दिसत नाही. येत्या २ अॅाक्टोंबरला एक डाव भुताचा सिनेमा रिलीज होणार आहे.
या सिनेमात मदन नावाचे कॅरेक्टर अभिनेता सिद्धार्थ जाधव साकारताना दिसत आहे. मदनच्या स्वप्ननात अनेक भटकणारे आत्मे येतात, त्यांची इच्छा त्याच्याजवळ व्यक्त करतात. असाच एक आत्मा त्याला भेटतो माझी इच्छा तोच पूर्ण करणार असे सांगतो. तिथून पुढे सिनेमाची कथा सुरू होते. या भटकत्या आत्म्याचा रोल अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केला असून, त्या आत्म्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदनकडे तो सतत तगादा लावताना दिसतो. यात पुढे काय होणार यासाठी २ अॅाक्टोंबरची वाट पाहावी लागेल. सिनेमात मकरंद आणि सिद्धार्थ यांची कॅामेडी पाहिला मिळणार यात काही शंका नाही. सिनेमाचे दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे.
१८८२ मध्ये एक डाव भुताचा सिनेमा येवून गेला
८० च्या दशकात एक डाव भुताचा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि दिलीप प्रभावळकर हे होते. तसेच दिवंगत अभिनेत्री रंजना या देखील होत्या. त्याकाळी सिनेमाला एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा तयार केला होता. यामध्ये देखील एक आत्मा आहे, जो दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या पात्राला दिसतो. या आत्म्याचा रोल अशोक सराफ यांनी केला होता. या सिनेमाला त्यावेळी एक वेगळा प्रयत्न म्हणून पाहिले गेले होते.