फुरसुंगीः राज्य शासनाने फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांना पुणे महापालिका क्षेत्रातून वगळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला असाल्याची माहिती मिळत आहे. त्याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२०१७ मध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांना पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, या दोन गावांना महापालिकेत समाविष्ठ करुन देखील येथील रहिवाशांना सोयीसुविधा मिळत नव्हत्या, तसेच महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने त्याबाबतची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत ही दोन गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी ६ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत केली होती. आता यावर जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात लोकसंख्येनुसार ‘ब’ वर्ग नगरपालिका करता येऊ शकते, असा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकार आता या दोन गावांबाबतचा काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
महिनाभरात साडेचार हजारांहून हरकती-सूचना झाल्या प्राप्त
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिका क्षेत्रातून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याचे जाहीर केले होते. या विषयाच्या अनुषंगाने नागरिकांना हरकती-सूचना मागविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी महिनाभराची मदत देण्यात आली होती. या महिनाभराच्या मुदतीत जिल्हा प्रशासनाकडे साडेचार हजारांहून अधिक हरकती-सूचना प्राप्त झाल्या होत्या.
ही दोन गावे महापालिकेच्या हद्दीमध्ये ठेवावीत त्यासाठी कारणे देत २ हजारांहून अधिक नागरिकांनी हरकती सूचना मांडली होती. तर स्वतंत्र नगरपालिकाही या हद्दीचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करू शकते. विकासकामांसाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र निधी मिळू शकतो. चांगले प्रशासन देता येऊ शकते, त्यामुळे या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, असे सांगत राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करीत २ हजार ३०० हून अधिक नागरिकांनी केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगागाने हा निर्णय राजकीय ठरणार आहे. या निर्णयाविरुद्ध गावांतील काही नागरिक पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.