साताराः गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी कोंबीग अॅापरेशन राबवत येथील राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करुन रिकॅार्डवरील व अन्य संशयितांना चेक करुन प्रभावी कारवाहीच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपीला पकडले
पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व परितोष दातीर यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना म्हसवे गावच्या हद्दीतील डीमार्ट ते वाढे फाटा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग म्हसवे गावाकडे जाणाऱ्या पुलाच्याखाली रिकार्डवरील आरोपी प्रथमेश उर्फ टॉम बाळासाहेब जगताप, रा.वर्ये, ता. जि. सातारा व २ अनोळखी इसम उभे असल्याचे दिसले. पोलीसांचे वाहन दिसताच त्यापैकी २ इसमांनी अंधाराचा फायदा घेवून त्या ठिकाणाहून पळ काढला. तर एका इसमास पथकातील पोलीसांनी मोठ्या शिताफिने पकडून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २ देशी बनावटीची पिस्टल, ३ जिवंत काढतुसे दोन मोटरसायकल असा एकूण मिळून २ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईत जप्त केला आहे. आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम (सुधारीत २०१९) चे कलम ३, २५ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासून ९५ देशी बनावटीची पिस्टल, ४ बारा बोअर रायफल, २२१ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या आहेत.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, अमोल माने, प्रविण कांबळे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, गणेश कापरे, मोहन पवार, ऑकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, केतन शिंदे, स्वप्नील दौंड, प्रविण पवार, प्रिती पोतेकर, शिवाजी गुरव, अमृत कर्षे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.