इंदापूरः प्रतिनिधी सचिन आरडे
इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांचे यांचे पुत्र अॅड. राहुल मखरे (rahul makhare) त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. याबबात त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात मखरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) शरद पवारांच्या( sharad pawar) उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी मखरे म्हणाले की, शरद पवार हे शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार कृतीतून जगणारे मोठे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात काम करण्याची माझी इच्छा आहे. मी स्वतः शरद पवार यांना ही इच्छा बोलून दाखविली आहे. ती त्यांनी मान्य देखील केली आहे. मी पद आणि खुर्चीसाठी कधीच काम केले नाही. राजकीय आश्रयामुळे कार्यकर्त्यांची अडलेली कामे पूर्ण होतात. मी पक्षप्रवेशांतर शरद पवार व पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.