Wednesday, October 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कौतुकास्पद : कष्ट व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते – विजय कोलते

बुद्धिमत्तेमुळे या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले

by SBPRNL
September 3, 2024
कौतुकास्पद : कष्ट व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते – विजय कोलते

सासवड (बापू मुळीक) :  कष्ट व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते. परीक्षा देताना यश अथवा अपयश येणे ही बाब घडत राहते. पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळेच मुलं घडत राहतात. त्यांनी कोणत्याही क्षेत्रात पदार्पण केले तरी त्यांना यश मिळते. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे.असे विचार महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.

राज्य लोकसेवा आयोग व इतर क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गेली ३७ वर्षे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान , पुरंदरच्या वतीने सत्कार करण्यात येतो. त्यानिमित्ताने यावर्षी पोलीस उपनिरीक्षक – रेवती भोसले, सुधा भोसले, जनक जावरे, अजिंक्य जौंजाळ, शरद नवले,निखील राणे, अतुल कोलते, राजश्री चौरे . सनदी लेखापाल – रेखा गायकवाड , अनुजा जैन, प्रतिक मारणे, तन्मय कदम . स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – प्रतिक कोलते, अश्विनी राठोड, कोमल मेमाणे . कर निर्धारण अधिकारी – सायली ढुमे , सागर जाधव , कृषी मंडल अधिकारी मानसी पवार , कृषी अधिकारी- ज्योती वायकर ,बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी कल्याणी जगताप यांचा सन्मान करण्यात आला.

You might also like

बस चालक ,वाहक संपाने , प्रवासी “ना घरका न घाटका”

दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

सत्कार प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना आम्ही कुठल्या समाजाचे आहोत. याचा विचार न करता आमच्या बुद्धिमत्तेमुळे आम्ही या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. भविष्यामध्ये या देशाचे नागरिक म्हणून गोरगरीब समाजासाठी उत्तम काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. असे विचार सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वतीने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झालेल्या अश्विनी राठोड यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव शिवाजी घोगरे, गौरव कोलते, कलाताई फडतरे, दिलीप निरगुडे, कुंडलिक मेमाणे, केशव काकडे, विकास कोलते, संतोष कोलते , अशपाक बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक यांनी केले. सूत्रसंचालन चौरंगनाथ कामथे यांनी तर आभार प्रतिष्ठानचे सहसचिव बंडूकाका जगताप यांनी मानले.

Tags: purandar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

बस चालक ,वाहक संपाने , प्रवासी “ना घरका न घाटका”
पुरंदर

बस चालक ,वाहक संपाने , प्रवासी “ना घरका न घाटका”

September 3, 2024
दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
ताज्या बातम्या

दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

September 3, 2024
Next Post
भोरः १९७६ मध्ये येथे औद्योगिक वसाहत थाटण्याची मूहुर्तमेढ रोवली, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन देखील झाले पण……

भोरः १९७६ मध्ये येथे औद्योगिक वसाहत थाटण्याची मूहुर्तमेढ रोवली, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन देखील झाले पण......

ताज्या बातम्या

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group