पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीला बाजूला थांबा, असे म्हटल्याच्या रागातून अंगावर चारचाकी घालून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणीकंद परिसरात घडली आहे. या प्रकरणी लोणीकंंद पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौरव दीपक लगड, अविनाश बनकड शेळके, सुरेखा अनंत सवणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात संकेत सिंधू पडवळ यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. सदर घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास तुळापूर-आळंदी रस्त्यावर आमसिल कंपनीच्या समोर घडली होती. या घटनेत जगदीश शिवेकर, सुहास हरिदास शिंदे, सोनम कविता अंधारे, अश्विनी पावसे आदी जखमी झाले होते.
 
								 
                                
 
                                 
                                 
                                 
		





 
							










