पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
आयबीपीएस परीक्षा (IBPS) आणि एमपीएससीची (MPSC) राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुण्यातील नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर (SHASHTRI ROAD) आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. या आंदोलनाला विरोधी पक्ष नेत्यांनी देखील पाठिंबा दर्शवित आंदोनलकर्त्यांची भेट घेतली होती. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEPUTY CHEIF MINISTER DEVENDRA FADANVIS) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती केली असून, या संदर्भात महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती.
MPSC च्या विद्यार्थ्यांचे मागच्या तीन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरु होते. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेत अखेर मुख्यमंत्री कार्यालयाने २५ ऑगस्ट २०२४ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांनी पुकारलेल्या आंदोलनला अखेर यश आले आहे.