भोरः भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुंबईतील बदलापूर येथील घटनेचे वार्तांकन करणाऱ्या दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव यांना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अर्वाच भाषा वापरली होती. म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी तहसिलदार भवन येथे भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुणम सुनंदा भिला अहिरे परि. उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसिलदार भोर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष सारंग शेटे, माजी अध्यक्ष सुर्यकांत किंद्रे, सचिव स्वप्निल पैलवान, माजी अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष विलास मादगुडे, सदस्य अर्जुन खोपडे, दिपक येडवे विनय जगताप उपस्थित होते.
या निवेदनात वामन म्हात्रे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्या आला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर लोकभावनेचा अनादर करीत या घटनेला सर्वस्वी पत्रकार कारणीभूत आहेत. पत्रकार आग लावण्याचे काम करीत आहेत. असे वक्यव्य बदलापूरचे मा. नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केले. तसेच तू अशा बातम्या देत आहेस, की जणू अत्याचार तुझ्यावरच झाला आहे. असे शब्द पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून वापरले. त्यांच्या या वक्त्यव्याचा भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तसेच म्हात्रे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.