जेजुरी: येथील लक्ष्मीनगर भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ अॅागस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर येथे मरी आई माता मंदिराच्या पत्रा शेडमध्ये एका अनोळखी महिला वय यंदाचे ६५ ते ७० वर्ष मृतदेह आढळून आला आहे. मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले असून, जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथील शीतगृहात महिलेचा मृतदेह ठेवण्यात आला आहे.
सदर महिललेचे केस काळे पांढरे बारीक स्वरुपाचे आहेत. जेजुरी पोलीस स्टेशन येथे प्रदीप गंगाराम खोमणे रा. खोमणे नगर जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे यांनी खबर दिली असून, त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये या महिलेची अकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर मयताचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ननवरे करीत आहेत. तरी सदर माहिती बाबत काही एक माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.