जेजुरीः प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे
येथील जेष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने उद्योजिका, कला-संस्कृती उपासक विद्या घोडके यांना चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृती सन्मान मिळाल्याबद्दल तसेच, समाजिक पर्यावरण जीवन शैली जोपासना आणि मार्गदर्शन करणारे निवृत्त बँक अधिकारी वाळिंबे यांचा सन्मान जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष श्याम पेशवे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य राष्ट्रपती पारितोषक विजेते नंदकुमार सागर, पुण्यश्लोक विद्यामंदिर महाविद्यालयाचे प्राचार्य सुबोध गुरव, विद्यालयातील शिक्षक निगडे सर आदी प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्यासाठी उपस्थित होते. जेष्ठ नागरिक जीवनशैली ही ताण तणाव मुक्त जगता येण्याकरिता आहे. तसेच पर्यावरण, निसर्ग आणि मैत्रीचा सलोखा जोपासला जावा. आध्यत्मिक सारख्या माध्यमातून स्वतःला झोकून द्यावे, असे विचार सन्मानर्थी वळिंबे सर यांनी मांडले. तर जेष्ठ नागरिकांनी दिलेला सन्मान हा जीवनात महत्वपूर्ण आशीर्वाद आहे. यामुळे सामाजिक कार्याला दिलेली ही मोठी प्रेरणा असल्याचे मत दुसऱ्या सन्मानार्थी विद्या घोडके यांनी मांडले.
या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक संघटनेचे शस्तप्रिय कार्यप्रणालीचे नंदकुमार सागर सर आणि सुबोध गुरव सर यांनी सन्मार्थींचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन सुहास बारभाई, नंदकुमार निरगुडे, माणिक पवार, कराळे सर, उषा आगलावे यांनी केले. तर सूत्रसंचालन कोरपड सर यांनी केले. या कार्यक्रमात मोफत भोजन आणि दैनंदिन जीवनशैलीवर विशेष विचार मांडण्यात आले