भोर:भोर तालुक्यातील पेंजळवाडी येथील रहिवासी ४६ वर्षीय शेतकरी संतोष रामचंद्र चव्हाण यांचे अपहरण करून त्यांच्याकडून २६ हजार रुपये लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चव्हाण यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी आदेश बोबडे आणि सोपान जाधव यांनी चव्हाण यांना शिरवळ येथे जेवण्यासाठी बोलवले होते. चव्हाण जेव्हा गाडीत बसले तेव्हा त्यांना आरोपींनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. चव्हाण यांच्या मित्र दादा चव्हाण यांच्याबद्दल माहिती न दिल्याबद्दल आरोपी संतापले होते.
आरोपींनी चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून 26,000 रुपये लुटले. चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली .तरीदेखील त्यांनी आरोपीच्या तावडीतून सुटत पळ काढला. राजगड पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली. पोलिसांनी आदेश बोबडे, सोपान जाधव आणि अमोल घाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.
तीनही आरोपी फरार असून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी विशेष टीम तयार केली आहे.