भोर : तालुक्यातील वेळवंड खो-यातील पसुरे व कर्नवडीतील शेतक-यांवर फार्महाऊस पार्टीवाले रिटायर्ड मेजरने (संपूर्ण नाव माहीत नाही) गोळीबार केल्याची घटना बुधवार (दि.१५) दुपारनंतर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार पसुरेतील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर अनधिकृत अतिक्रमण करून विजेचे खांब उभे केली असता शेतकरी विचारणा करणेसाठी गेले असता रिटायर्ड मेजर (कर्नल)एच.पी.सिंग यांनी स्थानिक शेतकऱ्यांवर गोळीबार करून धमकवण्याचा प्रयत्न केला असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.बि-हामणेवाडीतील अशोक गेणबा बि-हामणे, प्रकाश तुकाराम शेलार, शंकर दिनकर बि-हामणे, सोनबा कोंडीबा बि-हामणे चंद्रकांत कुरुंगावडे व कर्नवडीतील पवार हे शेतकरी जाब विचारण्यासाठी गेले होते.जागेच्या वादातून मेजर /कर्नल यांनी संबंधित शेतकऱ्यांना घाबरवण्याकरीता हवेत दोन फायर केले.
मेजर व शेतकरी यांच्या वादावादी झाली. अशी माहिती येथील गावकऱ्यांकडून मिळाली आहे. या झालेल्या घटनेने वेळवंड खोऱ्यात फार्महाऊस, रेस्टॉरंट, हॉटेलवाले , पार्टीवाल्यांची दहशत निर्माण झाली आहे. सेल्फ डिफेन्स करीता दिलेली बंदूक मेजर ,कर्नल यांनी लोकांना घाबरवण्याकरीता वापरली असल्याचे लोकांकडून सांगण्यात आले.
पसुरे येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर अनधिकृत अतिक्रमण करून विजेचे खांब उभे केली असता शेतकरी विचारणा करणेसाठी गेले असता….
स्थानिक शेतकऱ्यांवर गोळीबार करून धमकवण्याचा प्रयत्न केला असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत…..