वेल्हे: तालुक्यातील मानाची समजली जाणारी विंझर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली सतीश लिम्हण यांची बिनविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या हस्ते मोनाली सतीश लिम्हण यांना गौरविण्यात आले.
विंझर ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असुन मानाची व प्रतिष्ठेची समजली जाते,सरपंच यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते,सरपंचपदासाठी मोनाली सतीश लिम्हण यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी मोनाली सतीश लिम्हण यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या हस्ते मोनाली लिम्हण यांना गौरविण्यात आले.
यावेळी माजी सरपंच विनायक लिम्हण,सुनिल भोसले,अमोल गायकवाड, उपसरपंच नुतन गायकवाड,अंकुश सर्व ग्रामपंचायत सदस्य आदीसह ग्रामस्थ
उपस्थित होते.