Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर 16 hours ago
शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे 4 days ago
Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र 6 days ago
Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 6 days ago
Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके  1 week ago
Next
Prev
Home भोर

दुष्ट प्रवृत्या ओबीसी व मराठा समाजात भांडणे लावून दंगली भडकविण्याचे काम करीत आहेत – मनोज जरांगे पाटील

by Team Rajgad Publication
November 19, 2023
0
SHARES
431
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुणबी दाखले मिळत असल्याने मराठा आरक्षण हे निश्चित मिळेल. परंतु काही दुष्ट प्रवृत्या ओबीसी व मराठा समाजात भांडणे लावून दंगली भडकविण्याचे काम करीत आहेत.त्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका. एक डिसेंबर पासून गावागावत साखळी उपोषणे सुरु करून सरकारला निवेदने देऊन दबाव निर्माण करा, ‘मराठा आरक्षण घेणारच आणि तेही ओबीसीमधूनच. सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेऊ,’ असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी भोर येथील शेटे मैदानावरील सभेत बोलताना व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भोर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भोर येथील शेटे मैदान येथे आयोजित मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेला मोठी गर्दी होती. यावेळी जरांगे पुढे म्हणाले, मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी, तरुणांना शिक्षण क्षेत्रात, नोकरी, व्यवसायात योग्य संधी प्राप्त व्हावी यासाठी मराठा आरक्षणाची नितांत गरज आहे.

You might also like

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

’24 डिसेंबरला आरक्षण देण्याचा सरकारचा शब्द आहे. तोपर्यंत मराठय़ांची कसोटी आहे. गाफील राहिलात तर तुमच्या लेकरांच्या वाटोळ्याला तुम्हीच स्वतः जबाबदार असाल,’ अशा शब्दांत जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना सावध राहण्याचे, तसेच प्रचंड ताकदीने एकत्र येण्याचे आवाहन केले. ‘आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीला नोंदी शोधण्यास सांगितले होते. राज्यभर लाखो नोंदी सापडल्या आहेत. या नोंदींचा अहवाल तयार करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे आहे,’ असे ते म्हणाले.

मराठ्यांना कोणाच्याही वाट्याचे आरक्षण नको आहे, तर हक्काचे आरक्षण हवे आहे. समाजाला गेल्या ७० वर्षांपासून स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पुढाऱ्यांनी आरक्षणापासून दूर ठेवले आहे. आताही आरक्षणाच्या प्रश्नांवरून समाजाला अडविण्याचा प्रयत्न होत आहे. आजपर्यंत समाजाच्या पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या आहेत. किमान आत्ताच्या आणि पुढच्या पिढीला तरी लाभ व्हावा यासाठी आरक्षणाचा लढा तीव्र करीत आहोत.

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आरपारची लढाई संपूर्ण राज्यात चालू आहे. पुराव्यांचा प्रश्न निर्माण करणारे कुणबी मराठा हा पुरावा मिळायला लागल्याने ओबीसी समाजाला हाताशी धरून आरक्षण विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयत्न मराठा सामाजाने हाणून पाडायचा आहे.

राज्य शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल त्याशिवाय हा लढा थांबणार नसून आरक्षण मिळाल्यानंतरच स्वतःच्या घरात पाऊल ठेवणार आहे. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी अनेक टोळ्या समोर येत आहेत. महराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी समिती स्थापन करून कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु केले आहे, लाखो नोंदी सापडल्या असून शासनाला मराठा समाजाल आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही. भोर तालुक्यातील मराठा समाजाने शांततेत आंदोलन करायचे आहे. आंदोलनाला गालबोट लागू देवू नका असेही आवाहन जरांगे- पाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मराठा बांधवांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. भोर सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांचे तलवार, पुष्प गुच्छ व प्रतिमा देवून स्वागत करण्यात आले. भोर तालुक्यातील मराठा समाज सभेसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगवे फलक लावल्याने भोर शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. अबाल वृद्धांपासून सर्वांचीच सभेला उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. भोर येथील शेटे मैदान या ठिकाणी व्यासपीठ तयार करण्यात आले होते. भोर तालुक्यातील अनेक संघटनांच्या कार्यकत्यांनी जरांगे पाटील यांच्या सभेला हजेरी लावली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एक डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषण सुरु करण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी भोर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही!

जरांगे पाटील ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाल आरक्षण मिळावे या साठी आग्रही आहेत. असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयन्त जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. परंतु ओबीसी समाजाच्या सर्वसामान्य लोकांचा या आरक्षणाला कसलाही विरोध नाही, जागोजागी मराठा बांधवांबरोबर ओबीसी समाजातील तरुण सुध्दा स्वागताला पुढे येत आहेत. छगन भुजबळांसारखे काही नेते जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर वक्तव्य करून दोन समाजात वितुष्ठ आणण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका त्यांनी केली.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर
भोर

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

June 1, 2025
ताज्या बातम्या

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके 

May 26, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – रायरेश्वर गडावर उद्या रविवारी होणार स्वच्छता मोहीम ; खासदार निलेश लंके यांचा गड, किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील तिसरा गड

May 24, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

June 1, 2025

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.