प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोरच्या साखळी उपोषणाचा आजचा चौथा दिवस,आंगसुळे- कंकवाडी गावच्या तरुणांनी मुंडन करत मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात आक्रोश केला व्यक्त
भोर तालुक्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या साखळी उपोषणाच्या आज चौथ्या दिवशी भोरमधील १५० सदस्यिय केमिस्ट मेडिकल असोसिएशनच्या संघाने उपोषण स्थळी शिवतीर्थ येथे जाऊन आपला जाहीर पाठिंबा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष संजय भेलके यांना पत्र देत दर्शविला यावेळी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सचिव व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तसेच भोर तालुक्यातील जुने बुजुर्ग निवृत्त सेवा शिक्षक संघाच्या वडीलधाऱ्या जेष्ठ सदस्यांनी आपला आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या बुधवार दि१ या दिवशी सकाळी आंगसुळे- कंकवाडी गावच्या काही तरुणांनी सरकारला जागे करण्यासाठी , सरकारच्या निषेधार्थ आपले मुंडन मराठा आरक्षणाबाबत घोषणा देत भोर शहरात आपल्या भावना व सरकार विरोधात आक्रोश व्यक्त केला. वेळवंड येथे देखील चाळीस गावांच्यावतीने साखळी उपोषण सुरू त्या ठिकाणीही गावकरी मराठा आरक्षण मुद्द्यावर सरकार विरोधात ठाण मांडून बसले आहेत.