भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
सध्या शहरातील घरपट्टी करवाढीसाठी चर्चेत असणारी भोरची नगरपालिका शहरातील मंगळवार पेठेतील अतिक्रमणे गुरुवार (दि.१९) ला हटविणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे
मिळालेल्या माहितीनुसार,एसटी बस स्थानक ते मंगळवार पेठेतील महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हि अतिक्रमणे वाहतूक कोंडीला जबाबदार आहेत. अतिक्रमणे करणारे व्यापारी , व्यावसायिकदार यांचे वाहनचालक बरोबर वारंवार वाद होत आहेत हि अतिक्रमणे त्रासदायक ठरत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये , नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबावा, यासाठी भोर नगरपालिकेने अतिक्रमणाबाबत ठोस पाऊल उचलले असून गुरूवार दि.१९ बाजारपेठेतील ( मंगळवारपेठ) अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करणार असल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी सांगितले.
मागील महिन्यात तालुका समन्वय समितीच्या आढावा बैठकीत शहरातील वाहतूक सुरळीत करणे व अतिक्रमणे काढण्याबाबत आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील भोर बसस्थानक ते मंगळवार पेठ या मार्गावरील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या ५५ जणांना यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत . सोमवार दि.१६ पुन्हा एकदा सर्वांना नोटीसा बजावुन, चोवीस तासांच्या आत स्वतः अतिक्रमणे काढण्याची विनंती नगरपालिकेकडून केली आहे. अतिक्रमणे काढण्याची कारवाई तात्पुरती नसून कायमस्वरूपी सुरू राहणार आहे असे भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी सांगितले.