Wednesday, June 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

by SBPRNL
June 16, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

वेल्हे, ता. १६ : राजगड तालुक्यातील कानंद गावाच्या हद्दीतील डिंगळी डोंगर परिसरात एका दिवसाच्या नवजात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आमगोळीच्या झाडाजवळ हा मृतदेह बेवारस अवस्थेत पडलेला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून नवजात अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You might also like

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

प्राथमिक माहितीनुसार मृत अर्भक हे स्त्री जातीचे असून तिचे वय अंदाजे एक दिवस असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गम डोंगराळ भागात अशा प्रकारे नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित अर्भकाला त्या ठिकाणी कोणी आणून टाकले, तिच्या मृत्यूमागे कोणते कारण आहे, तसेच या घटनेत कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस विविध अंगांनी करीत आहेत.

घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. नवजात बालिकेला अशा अवस्थेत टाकून देणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून परिसरातील नागरिकांची चौकशी करण्यात येत असून जवळील गावांमध्ये अलीकडील काळात प्रसूती झालेल्या महिलांची माहितीही गोळा केली जात असल्याचे समजते.

या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमागील सत्य उघड करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा
भोर

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा
खंडाळा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”
क्राईम

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!
क्राईम

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 15, 2026
मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू
क्राईम

मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 15, 2026

ताज्या बातम्या

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group