Monday, June 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

by SBPRNL
June 15, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

खंडाळा : हिंजवडी येथे जप्त करण्यात आलेल्या ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांच्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांच्या हिंजवडी अमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा जिल्ह्यात येऊन केलेल्या कारवाईत आणखी अमली पदार्थांचा साठा जप्त झाला असून, या प्रकरणात अहिरे गावच्या माजी उपसरपंचाचेही नाव समोर आले आहे.

हिंजवडीतील मुक्ताईनगर परिसरात ११ जून रोजी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या अक्षय प्रदीप धायगुडे (३१), दयानंद उत्तम धायगुडे (३८) आणि महेश पुनाराम किचड ऊर्फ बिश्नोई (२१, सर्व रा. अहिरे, ता. खंडाळा) यांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्यांच्या ताब्यातून ६१.७० ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक चारचाकी वाहन आणि तीन मोबाईल असा एकूण ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

You might also like

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चौकशीदरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार अशपाक ऊर्फ मोन्या काझी (रा. अहिरे) आणि हनुमान किलेरी ऊर्फ बिश्नोई (रा. खंडाळा) यांची नावे समोर आली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने खंडाळा तालुक्यात छापा टाकून संशयितांच्या निवासस्थानी झडती घेतली. या कारवाईत २८.४४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत २ लाख ८४ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये दयानंद धायगुडे याचा समावेश आहे. तो अहिरे गावचा माजी उपसरपंच असून सध्या ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य आहे. गावातील लोकप्रतिनिधीचे नाव ड्रग्ज व्यवहारात समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणी अक्षय धायगुडे, दयानंद धायगुडे, महेश किचड ऊर्फ बिश्नोई, अशपाक काझी आणि हनुमान किलेरी यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत असून तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

खंडाळा तालुक्यापर्यंत पोहोचलेल्या ड्रग्ज साखळीमुळे सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

खंडाळा तालुक्यात ड्रग्जविरोधातील दुसरी मोठी कारवाई

खंडाळा तालुक्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी लोणीकंद पोलिसांनी शिरवळ परिसरात कारवाई करत सुमारे ७१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्या प्रकरणातही अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास करण्यात आला होता.

आता हिंजवडी पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खंडाळा तालुक्यात धडक कारवाई करत आणखी एमडी ड्रग्ज जप्त केल्याने तालुक्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या नेटवर्कबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा खंडाळा तालुक्याचे नाव एमडी ड्रग्ज प्रकरणात समोर आल्याने पोलिसांसमोर या रॅकेटचे मूळ शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची कारवाई; नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

खंडाळा तालुक्यात एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत पुणे पोलिसांनी थेट कारवाई करून अमली पदार्थांचा साठा जप्त केल्यानंतर नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात ड्रग्जचे जाळे सक्रिय असताना त्याचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केल्याने सातारा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, यापूर्वीही शिरवळ परिसरात लोणीकंद पोलिसांनी एमडी ड्रग्ज जप्तीची कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी खंडाळ्यात धडक कारवाई केल्याने “स्थानिक यंत्रणांना याची माहिती नव्हती का?” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

मात्र, या प्रकरणात सातारा पोलिसांची नामुष्की झाली आहे का, याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तपास यंत्रणांमधील समन्वयाचा भाग म्हणून एका जिल्ह्यातील पोलिस दुसऱ्या जिल्ह्यात कारवाई करतात, हेही वास्तव आहे. तरीही सलग दोन मोठ्या ड्रग्ज प्रकरणांचे धागेदोरे खंडाळा तालुक्यात सापडल्याने नागरिकांकडून अधिक प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”
क्राईम

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!
क्राईम

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 15, 2026
मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू
क्राईम

मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 15, 2026
खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार
क्राईम

खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

June 14, 2026
पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
क्राईम

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026

ताज्या बातम्या

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group