भोरला सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे वेताळ पेठेतील तुफान मित्र मंडळ व जय माताजी महिला मंडळाकडून सिल्व्हर बर्च हाॅस्पिटल(धायरी नवले ब्रिज) यांच्या विशेष सहकार्याने मंगळवार (दि.२३) रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी शहरातील १३५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये नवरात्रोत्सव असल्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या तपासणी शिबिरात नागरिकांचे ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि ई.सी.जी. इत्यादी सुविधा मोफत देण्यात आल्या तसेच तपासणी नंतर रोगाचे निदान झाल्यावर ज्या प्रकारची शस्त्रक्रिया करायची आहे व इंटोजिओग्राफी अशा अनेक सुविधा अल्पदरात देण्यात येणार आहे अशी तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच सिल्वर बर्च हॉस्पिटल येथे सर्व विकारांवरील उपचार किंवा शस्त्रक्रिया या सरकारी योजने अंतर्गतही आणि सर्व प्रकारचे मेडिकल इन्शुरंस केले जात आहेत असेही सांगण्यात आले.तुफान मित्र मंडळाकडून आरोग्य तपासणीस येणाऱ्या नागरिकांना आरोग्यदायी फळे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळातील जेष्ठ सभासद व कार्यकर्ते तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.