भोर : – निवासी मूकबधिर शाळा भोर व ज्ञानमंत्र शिक्षण संस्था आपटी या संस्थेस ऍडव्हेंचर प्लसकडून अन्नधान्य वाटप करण्यात आले .ऍडव्हेंचर प्लसचे संचालक शुभम लढ्ढा यांनी आपटी येथिल अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट देली यावेळी ह.भ.प.सुनीलज धुमाळ तसेच माजी नगरसेवक राजू पवार,आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गाडे,बापू रणखांबे,संस्थेचे अध्यक्ष राहुल महाराज पार्टी व नागरिक उपस्थित होते.
ऍडव्हेंचर प्लस रिसॉर्टचे संचालक शुभम लढ्ढा यांच्या माध्यमातून निवासी मूकबधिर शाळा भोर व ज्ञानमंत्र शिक्षण संस्था आपटी या संस्थेतील मुलांसाठी अन्नधान्याची मदत करण्यात आली.तसेच सुनिल धुमाळ यांच्याकडून मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आला. प्रस्ताविकात राहुल महाराज पारठे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली यावेळी बोलताना शुभम लढ्ढा म्हणाले आपण काही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून येथिल मूक बधिर मुले आणि वारकरी संस्थेत शिकणा-या मुलींसाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन दिले.