भोर :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वी अभियांनातर्गत अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर कालावधी दरम्यान संपूर्ण तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार असून भोर तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यात शिवरस्ते,पाणंद रस्ते यांचे सीमा निश्चित करण्यात येणार असून नकाशावर नोंद करण्यात येणार असल्याचे प्रांत अधिकरी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सांगितले पुनर्वसन अतंर्गत वर्ग २ जमीनी असलेल्या लाभार्थ्यांना वर्ग १ मध्ये रुपांतर करुन तसे ७/१२ वितरीत करणे,वृक्ष लागवड करणे, पोटखराब क्षेत्राचे लागवडीलायक क्षेत्रात रुपांतर करणे,एकाच नावाच्या अधिक व्यक्ती असल्यास आईचे नाव किंवा टोपण नाव वाढविणे तसेच दुसऱ्या टप्यात सर्वांसाठी घरे योजने अंतर्गत ग्राम विकास विभागा मार्फत सर्वेक्षण केलेल्या लोकांना घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे सेवापंधरवड्याची सुरवात दि.१७ सप्टेंबर रोजी होणार असून त्याची पूर्व तयारी म्हणून १७ तारखे पर्यंत सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी,ग्रामसेवक,लोकप्रतिनिधी पोलीस पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव यांच्यासह शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी गाव नकाशातील सर्व रस्ते तसेच गाव नकाशात नसलेले परंतू वहिवाटीत असलेले गाडी रस्ते,पायवाटा इ. चे सर्वेक्षण केले जाणार असून यात अतिक्रमण दिसून आल्यास त्यासाठी दिनांक १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.या ग्रामसभेत शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे घेतली जाणार आहेत. त्यातूनही विवादग्रस्त राहिलेल्या रस्त्यांबाबत तहसिलदार यांचे स्तरावर दिनांक १७ अदालत आयोजित करण्यात येणार असून सामोपचाराने अतिक्रमण दूर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.यासाठी भूमी अभिलेख विभागाकडूनही सदर सर्व रस्त्यांचे सीमांकन करुन सर्व रस्ते नकाशात दाखवून अभिलेखात त्यांची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच याबाबत स्थानिक स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही प्रांत अधिकरी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे