भोर – तालुक्यातील दुर्गम भागातील साळुंगण(ता.भोर) गावच्या अमोल दुरकर या युवकाने समाजापुढे एक आदर्श ठेवत आपल्या वाढदिवसादिवशी अनावश्यक खर्च टाळुन भोर एस बस स्थानकात चालक वाहक कर्मचारी यांना प्रथमोपचार (फर्स्ट एड) पेटी किटचे वाटप करण्यात आले.
सध्या वाढदिवस म्हटलं की, केक कापने, मित्रांना पार्टी देणे , मित्र मैत्रिणीं सोबत फिरणे , मौजमजा करणे असे अनावश्यक कामांसाठी खर्च केलाच जातो. परंतु अमोलने अशा खर्चांना फाटा देत अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत भोर बस स्थानकात प्रथमोपचार पेटी फर्स्ट एड किट वाटप केले. सध्या एस टी मध्ये बस मध्ये अचानक काही दुखले खुपले लागले किंवा आरोग्या विषयी काही समस्या जाणवू लागल्यास प्राथमिक उपचार म्हणून काही सोय सुविधा नसते कोणतेही औषध उपलब्ध नसते. ही गरज लक्ष्यात घेऊन अमोलने जवळपास १५ किट वाटप केले. आणि काही दिवसांनी cpr ट्रैनिंग ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना माहिती नि ट्रेनिंग देण्यात संस्था कडुन देण्यात येणार आहे युवा उद्योजक अमोल दूरकर यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातुन कौतूक होत आहे. अमोल दूरकर यांनी अभिनव उपक्रम राबवत आपला वाढदिवस वेगळ्या साजरा करून तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.यावेळी भोर शहरातील सह्याद्री रेस्क्यूचे सचिन देशमुख ,बबलू घाटे , विकी दुरकर ,स्वप्नेश नलावडे, तेजस मोहिते, निखिल गायकवाड ,अमोल दुरकर ,नागेश धुमाळ ,सनी धुमाळ ,ओंकार भोसले ,युवराज पिलाणे, राहुल दुरकर, प्रशांत थोरात ,अनिकेत लवटे ,सागर पवार ,घनश्याम शिंदे ,सर्जेराव साळेकर ,सोनू घाटे ,ओंकार वीर, आकाश शिळीमकर ,सुरज दुरकर , लहु शेठ नऱ्हे ,आदर्श गायकवाड, मयुर घोणे , दिपक गुप्ता, साहिल धामुणसे ,उमेश गायकवाड ,यश निकम ,गजानन दुरकर , करण कांबळे इत्यादी मित्र परिवार व बस कर्मचारी उपस्थित होते.