भोर – तालुक्यातील ऐतिहासिक असलेले रायरेश्वरचे पठार लहान लहान नाजूक फुलांनी आणि हिरव्यागार वेलिंनी फुलुन बहरुन गेले आहे. निसर्गातील विविध १० ते १५ रंगांची फुले आणि हिरवगार गलिच्यांनी पठार बहरल्याने हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटक व अभ्यासक नेहमीच येत असतात भोर शहरापासून सुमारे २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या व हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ला सुमारे १२ किलोमीटर लांब व अडीच किलोमीटर रुंद परिसर आहे.
या पठारावर आँगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले हिरव्यागार वेली एखाद्या गालीच्या सारखी पसरले आहेत.वनदेवतेने अंथरलेल्या अनोख्या गलिच्या पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व अभ्यासकांना सदरची फुले नेहमीच खुणावतात सद्या पावसाळी वातावरण डोंगरातून वाहणारे धबधबे आणि निसर्ग सोंदर्य पाहत मोठ्या प्रमाणात पर्यटक रायरेश्वर किल्यावर एकच गर्दी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले शिवकालीन शंकराचे मंदिर असून त्या काळात शिवाजी महाराजांनी शिवालयाची देखभाल करण्यासाठी कर्नाटकवरुन शिवा नावाच्या जंगमाला आणले होते. तेव्हापासून मागील साडेचारशे वर्षांपासून किल्ल्यावर राहत आहेत.किल्ल्यावर जिवंत पाण्याची झरे असून गायमुख,सात रंगाची माती व पांडवकालीन लेणी आहेत.कोर्ले गावावरून डोंगराला लावलेल्या शिडी मार्गाने जाणारी वाट,रायरी गावावरुन डोंगराला लावलेल्या लोखंडी शिडीची वाट या मार्गाने किल्ल्यावर जाता येते. फुलांचा बहर नोव्हेंबरपर्यंत असतो. रायरेश्वर पठार रंगीबेरंगी भरले असून किल्ल्याच्या पठारावर दहा ते पंधरा प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या छटा वा-याच्या झोकात आपला श्रृगार करीत असतात त्यामुळे रंगीबेरंगी फुलांची पठारावर विविध रंगाची उधळण होत असल्याचे पर्यटकांना पाहावयास मिळते ऑक्टोबर ऑगस्ट नोव्हेंबर पर्यंत फुलांचा बहर असतो अनेक पर्यटक दिवसभर भटकंती करून फुलांचे आणि येथील निर्सगाचा अभ्यास करण्यासाठी भटकंती करत असतात.माञ प्राथमिक सोयी सुविधांचा आभाव असल्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे