भोर- तालुक्यातील सर्व २०० गावांतील नकाशावर उपलब्ध असणाऱ्या, तसेच सर्व उपलब्ध वहिवाटीची, पाणंद, शिव रस्ते, शेत रस्ते यांची नोंद होऊन नंबर देण्यात येणार आहे अशी माहिती भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाकडील २९ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार मा. महसूल मंत्री यांच्या सूचनेप्रमाणे पुणे जिल्हयाचे मा. जिल्हाधिकारो जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालो नुकतीच तहसिल कार्यालयात बैठक घेणेत आलेली होती त्यामध्ये मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत साजरा करण्यात येणान्या महसूल सप्ताहातील पहिल्या टण्यातील १७सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीतील पाणंद रस्ता सप्ताहाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील २०० गावातील गाव नकाशे सर्व ग्राम महसूल अधिकारी यांना उपलब्ध करून देणेबाबत उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयास निर्देश दिलेल आहेत, तसंच गाँवकास अधिकारी यांनादेखील ग्रामसभेचे नियोजनाच्या दृष्टीने नियोजन करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुढील आठ दिवसांत आपल्या सजातील समाविष्ट असणाऱ्या गावामधील ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल यांनी सरपंच व सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयाने गावात शिवार फेरी काढून शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे नकाशावरील उपलब्ध नोंद असलेले ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण मार्ग (पोटखराबा) पायमार्ग (पोटखराबा) हे प्रपत्र १ मध्ये नोंद घेवून प्रपन्न १ तयार करायचे आहे. शतरस्ते (वहिवाटीच) यामध्ये सर्व प्रकारचे पाणंद, शेत, शिव रस्ते तसेच मामलदार कोर्ट अॅक्ट ११०६ चे कलम ५ खालील व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये आदेशित करण्यात आलेले रस्त्याची नींद ही प्रपत्र २ मध्ये घेण्यायावत सूचना दिल्या आहेत. भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात यांचे मार्गदर्शनाखाली उपरोक्त पाणंद रस्त्याबाबतचा कार्यक्रम पार पाडण्यात येणार असल्याचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सांगितले.