भोर – विद्यमान आमदार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बेछूट खोटे आणि धादांत आरोप केले त्यांनी तर मी लोकप्रतिनिधी नसून मला पत्रकार परिषद घेण्याचा अधिकारच नाही असे स्पष्ट केले परंतु मला संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपल्या लोकशाहीतील प्रत्येकाला मिळालेल्या व्यक्तीस्वातंत्र्यानुसार मी आजपर्यंत केलेल्या विकास कामांवषयी व त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. माझ्यावर होणारे आरोप हे फक्त हे माझ्या व्यक्ती द्वेषातून होत आहेत यातून स्पष्ट दिसत आहे.भाटघर निरा देवघर,चापेटगुंजवणी धरणांमधील अतिरिक्त पाणी खाली जाणारे पाणी यांना दिसत नाही ते थांबवण्याची धमक यांच्यात नाही , अर्धवट सिंचनाचे प्रकल्प कोणामुळे रखडले, हे तुमच्या नेत्याला तुम्ही जाब विचारण्याची तुमच्यात धमक आहे का? तसेच संविधानाप्रमाणे मला अधिकार असून, लोकशाहीत त्याला वाचा फोडण्याचे काम मी आजपर्यंत करत आलो आहे. याची विद्यमान आमदारांना कल्पना नसावी. शेजारी एक गाईड कागदावर लिहून देत होता, दुसरा टेलिग्राम कानात कुजबुजत सांगत होता. ते स्वतः काय बोलत होते, हे त्यांना तरी कळत होतं का ? तुम्ही तुमची पातळी राखा; अन्यथा आम्ही सुद्धा जशाच तसे उत्तर देऊ, अशी केलेल्या टिकेला सडेतोड उत्तर देत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्यावर टीका केली.
रायरेश्वर डोंगरी विकास परिषद येथे रविवारी (दि. ७) आमदार शंकर मांडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस प्रत्युत्तर देताना माजी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. या वेळी पोपट सुके, विकास कोंडे, विठ्ठल आवाळे, जीवन कोंडे, रवींद्र कंक, संतोष धावले, पल्लवी फडणीस, भाग्यश्री साठे, अतुल किंद्रे, रोहन बाठे, सचिन हर्णसकर, सुधीर खोपडे, उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, चंद्रकांत मळेकर, गणेश पवार, विजय शिरवले, माऊली पांगारकर, अमित सागळे, सुमंत शेटे, अभिषेक येलगुडे, नरेश चव्हाण, संतोष केळकर आदी उपस्थित होते.
थोपटे म्हणाले, माझ्यावर व्यक्तिदोषातून खोटे-नाटे आरोप केले जातात. मला जनतेचा कौल मान्य आहे. परंतु, त्यांचे प्रश्न सोडविण्यासही कटिबद्ध आहे. तुमचा विजय राजकीय अपघातातून आहे. सत्तेशिवाय कोणी राहू शकत नाही, हे तुमच्या नेत्यांना विचारा; मग त्यांना समजेल. सायकल स्पर्धा पंतप्रधान यांच्या सूचनेनुसार होणार आहे. मात्र, स्थानिक आमदार लोकांची दिशाभूल करत महायुतीत असुनही कधीच मुख्यमंत्री यांचे नाव घेत नसुन नुसते पालकमंत्री यांनी विकास कामे आणली. मी नेहमी पक्षाआदेप्रमाणे काम करत आलो आहे मी मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार काम केले तर विरोधकांना याची मिरची का झोंबली, हे समजत नाही.
सहकारी संस्था कोणी मोडून खाल्ल्या? डेअरी युनियन, कुक्कुटपालन संस्था यांसारख्या संस्था कोणी मोडून खाल्ल्या? राजगडचा कर्जपुरवठा रोखण्याचे काम कोणी केले? याचा जाब आधी नेत्वियांना विचारा? आता मुख्यमंत्री यांनी कर्जपुरवठा करून यांना चपराक दिली आहे. माझ्या पंधरा वर्षे विकास कामांचा अहवाल मी लोकांना दिला आहे तो त्यांनी पहावा ; मग आमदारांनी बोलावे. माझ्या कारकिर्दीत काम मंजूर झाल्याचे तुम्ही जाऊन उद्घाटन करतात ते कसे ? आणि आम्ही आमच्याच कामाचे आम्ही उद्घाटन केल्यानंतर श्रेयवाद कसला?
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रात्ररात्र मंडळांना भेटी दिल्या ही वेळ तुमच्या वर का आली ? तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कितीवेळा पक्ष बदलला, हे कसे चालते? मुळशी गायरान जमिनी जागा ग्रामपंचायतीला मिळावी म्हणून मी पाठपुरावा केला. तुम्ही त्या गावचे त्या भागातील असुनही का प्रर प्रस्ताव शासनाकडे गेला असून, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तुम्हाला जमले नाही म्हणून मी प्रयत्न केला, मग का झोंबतंय? तुम्ही धरणांमधील पाणी खाली जाऊ देऊ नका मीही तुमच्या सोबत उभा राहिल , तुम्ही चांगल्याला चांगले म्हणाले पहिजे; मात्र तुमचा स्तर खाली गेला आहे, अशा शब्दांत थोपटे यांनी आमदार मांडेकरांवर टिका केली.

















