भोर : अंगसुळे येथील सामाजिक भान जपणा-या काळेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (माळवाडी) २५ वे रौप्य महोत्सव साजरा करत गणरायाचे उत्साहात भक्तीभावाने ढोल ताशाच्या तालावर मिरवणूक काढुन फुले उधळत प्राण प्रतिस्थापना साजरी केली .
भोर पासुन १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री काळेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंगसुळे (माळवाडी) २५ वे रौप्य महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. अभिमान अंगसुळेचा राजा माळवाडीचा गणपती उत्सव साजरा करत आहेत. मंडळाकडुन गावात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत गावच्या सामाजिक कार्यामध्ये मंडळाचा नेहमी सहभाग असतो. एकी जप्त एकजुटीने राहण्याचा प्रत्यत्न समाजापुढे ठेवण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सोपान राऊत यांनी सांगितले मंडळाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.सदर कार्यक्रमात गावातील महिला पुरुष व आबालवृध्द सहभागी होतात.
 
								 
                                
 
                                 
                                 
                                





 
							









