भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ भोरची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात.
भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले.
भोर: कोणतीही सहकारी संस्था ही एका रात्रीत उभी रहात नाही.ती जीवंत ठेवणं सोपे नसते.त्यासाठी दुरदृष्टी ठेवून काम करावे लागते.योग्य नियोजन व तज्ञ, योग्य संचालक यामुळे खरेदी विक्री संघाने असेच चांगल्या प्रकारे काम करत ६३ वर्षे अविरत , संस्था उर्जित ठेवून अतुलनीय काम संघ करत आहे असे प्रतिपादन ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार थोपटे यांनी केले.
भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि.३०)भोर खरेदी विक्री संघ कार्यालयात पार पडली.
यावेळी माजी सभापती बाळासाहेब थोपटे,राजगडचे संचालक शिवनाना कोंडे, माजी चेअरमन बाळासाहेब शिंदे, सुभाष कोंढाळकर, रमेश चव्हाण, माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे, सतीश चव्हाण, अंकुश खडाळे, सुधीर खोपडे, चेअरमन अतुल किंद्रे, व्हा.चेअरमन अतुल शेडगे, संचालक संपत दरेकर, सोमनाथ सोमानी ,दत्तात्रय बाठे, विजय शिरवले ,नरेश चव्हाण, मधुकर कानडे , दिलीप वरे, सुजाता जेधे, वसंत वरखडे, किशोर बांदल, नंदा मोरे, पंचायत समिती कृषी खाते अधिकारी शिवराज पाटील आदींसह बाजार समिती तसेच राजगड साखर कारखान्याचे संचालक व संघाचे शेतकरी सभासद उपस्थित होते.
आमदार थोपटे पुढे म्हणाले तालुक्यात खरेदी विक्री संघाच्या असणाऱ्या ठिकठिकाणच्या आरक्षित जागांवरती नवीन इमारती उभारल्या जाणार असून पुढील काळात शेतकऱ्यांच्या बांधावर खते,बी -बियाणे व औषधे पुरवठा करण्याचा मानस राहील असे त्यांनी सांगितले तसेच सहकारी संस्थांचे नवीन पोटनियम ,कायदे, कानून याचा अभ्यास सर्व संचालक, कर्मचारी, पदाधिकारी यांनी अवगत करून घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. संघाचे चेअरमन अतुल किंद्रे यांनी संघानी केलेली अतुलनीय कामगिरीचा लेखाजोखा वाचत संघाचा वार्षिक आढावा वाचला.तसेच नरेश चव्हाण यांनी अहवाल सादर केला व प्रास्ताविक दत्तात्रय बाठे यांनी केले तर आभार सोमनाथ सोमानी यांनी मानले.