उपसरपंच रेश्मा आवाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड
भोर तालुक्यातील शहरालगत लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भोलावडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उपमुख्यमंत्री अजित पवार व रणजित शिवतरे यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पडवळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठरवुन दिलेला कार्यकाल संपल्याने रेश्मा मंगेश आवाळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी शुक्रवार (दि.६) निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी प्रशांत पडवळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी दयानंद निंबाळकर यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित उपसरपंच प्रशांत पडवळ यांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. तसेच या गावच्या ग्रामपंचायतीचा कारभार आणि सलग नऊ वर्षे ग्रामविकास अधिकाऱ्याची जबाबदारी कार्यक्षमपणे सांभाळणारे ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे यांचाही बदली होऊन गेल्याने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच प्रवीण जगदाळे, माजी उपसरपंच तथा सदस्य गणेश आवाळे, ग्रामपंचायत सदस्य, अविनाश आवाळे, ज्ञानेश्वर उर्फ बंडा तारू रेश्मा आवाळे, पुष्पा आवाळे, भाग्यश्री सावंत, शुभांगी रणखांबे, रूपाली इभाडे तंटामुक्ती अध्यक्ष गजानन आवाळे, उपाध्यक्ष राहुल कुंभार ग्रामस्थ महिला उपस्थित होते.
” गावातील जनतेनं निवडून देऊन जो विश्वास दाखवला आहे त्याच विश्वासास पात्र राहून जनतेची जास्तीत जास्त विकास कामे सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या मार्फत उपसरपंचपदी राहुन करणार आहे.व गावची एकी टिकवण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहाणार आहे.”
प्रशांत पडवळ- नवनिर्वाचित उपसरपंच, भोलावडे.(ता.भोर)