नागपूरः राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महायुतीमधील घटक पक्षांच्या वाट्याला कोणकोणती खाती येणार याची उत्सुकता आता लागली आहे. या खातेवाटबाबत आता मोठी अपडेट आली असून शिवसेनेला अतिरिक्त दोन खाती मिळणार असल्याची माहिती विश्वनिय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला गृहनिर्माण आणि पर्यटन हे खाते येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असले तरी या खात्यांसाठी कोणत्या मंत्र्याची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच परिवहन खाते भरतशेठ गोगावले यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्याच्या घडीला पाहिले तर नगरविकास, पाणीपुरवठा, शालेय शिक्षण, उद्योग, जलसंधारण, परिवहन, रोजगार हमी, माजी सैनिक, खनिकर्म, मराठी भाषा या खात्यांसह आता गृहनिर्माण आणि पर्यटन ही दोन महत्वाची खाते शिवसेनेला मिळणार आहेत. मात्र, अद्यापर्यंत कोणत्या मंत्र्याला कोणते खाते दिले जाणार याची घोषणा होणे बाकी आहे.