नागपूरः राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने नाशिकसह विविध ठिकाणी समता परिषद तसेच भुजबळ यांच्या समर्थकांनी निषेध नोंदविला होता. अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आले होते. या प्रकरणावर आता स्वःताह मा. मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली असून येथून मागे झाले ते सोडून आता यापुढे अशा प्रकारचे कृत्य जो कोणी करेल, तो समता परिषदेचा असू शकत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच अशा प्रकारच्या घोषणा अजित पवार व इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत न करण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
येथून पुढे अशा प्रकारचे कृत्य जर कोणी करीत असेल तर ते समता परिषदेचे असू शकत नाही. तसेच तुमचा राग, दुःख व्यक्त करण्याची माझी काही मनाई नाही, परंतु ती चांगल्या सुस्कृंत शब्दामध्ये व्यक्त झाली पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. या प्रकरणावर भुजबळ यांनी जास्त बोलणे टाळले आहे. नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून मंत्रीमंडळात अनेक दिग्यज्य नेत्यांचा पत्ता कट करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजीची भावना उसळून आली असल्याचे दिसत आहे.