नागपूरः उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विधिमंडळात सत्ताधाऱ्यांना राज्यातील विविध प्रश्नांचा घेराव विरोध पक्षांकडून केला जात आहे. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले होते. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली तसेच या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींचा सहभागा असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला आहे. यामुळे बीड आणि परभणी येथील तणाव या विषयांवर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोध घोषणा देत कापूस, सोयाबीान आणि तूर पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली आहे.
कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज कापसाच्या झाल्यावतीने सोयाबीनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हातात सोयाबीन, तूरची रोपं, गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले.