जेजुरीः महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदचे अध्यक्ष व पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष वासुदेव काळे, पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष निलेश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत अरुण भालेराव, प्रीतम खोमणे, देविदास उबाळे आदी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले, सरचिटणीस चंद्रकांत जगताप, युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दरेकर, महिला मोर्चा सरचिटणीस संपता खोमणे, उपाध्यक्ष सुमित्र पुजारी, निकिता धुमाळ, कामगार आघाडी सचिन कापडे, सरचिटणीस कल्पेश सूर्यवंशी, उद्योग आघाडी सचिन मोरे कार्यकर्ते उपस्थित होते. आणखी मोठ्या संख्यने जेजुरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष गणेश भोसले यांनी सांगितले.