मुंबईः महायुतीचे समन्वयक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाड यांनी पोलिसांत रितसर तक्रार दिली असून ज्याने धमकी दिली त्याने गडकरी, आठवले यांच्यासंबंधित ठिकाणांचा उल्लेख त्या व्यक्तीने केला असल्याचे लाड यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मनिष निकोसे असे धमकी देणाऱ्या इसमाचे नाव असून या अगोदरही त्याने लाड यांना धमकी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. लाड यांना या व्यक्तीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धमकी दिली आहे. या व्यक्तीचा शोध पोलिसांना लवकरात लवकर घ्यावा, अशी विनंतर लाड यांनी पोलिसांना केली आहे.
आठवले आणि गडकरी यांच्या नावांच्या उल्लेख
फोनकर्त्याने आपण केंद्रीय मंत्री आठवले यांच्या कार्यालयातून बोलतोय असे सांगितले तर कधी आपण गडकरी यांच्या कार्यालयातून बोलतोय अशी ही व्यक्ती बोलत असल्याचे लाड यांचे म्हणणे आहे.